Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 29 June 2020

रयत शिक्षण संस्था - घटनात्मक तरतुदी

🔹रयत शिक्षण संस्थेचा गेल्या शंभर वर्षातील विस्तार व घटनात्मक तरतुदी🔹

                            अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाचा मार्ग दाखविण्यासाठी  कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिनांक ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आता या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होऊन संस्थेची वाटचाल १०१ व्या वर्षात चालू आहे. कर्मवीर आण्णांनी लावलेल्या या वटवृक्षाच्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून, सध्या या संस्थेच्या एकूण ७६९ शाखा आहेत.

🔸संस्थेचे विभाग
१) मध्य विभाग:-
 या विभागात सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो.
२) दक्षिण विभाग :-
या विभागात सांगली, कोल्हापूर, बेळगाव, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.
३) उत्तर विभाग :-
या विभागात अहमदनगर, नाशिक, बीड आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश होतो.
४) पश्चिम विभाग:-
 या विभागात फक्त पुणे जिल्ह्याचा समावेश होतो.
५) रायगड विभाग :-
या विभागात रायगड, बृहन्मुंबई, ठाणे व पालघर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो.

 महाराष्ट्रातील पंधरा आणि कर्नाटकातील बेळगाव अशा १६ जिल्ह्यांमध्ये रयत शिक्षण संस्थेचा विस्तार आहे.

🔸शाखा
१) महाविद्यालये:-  ४३
२)माध्यमिक विद्यालये:-४४४
३)प्राथमिक शाळा :- ६२
४)पूर्व प्राथमिक शाळा:- ४७
५)अध्यापक विद्यालये :- ०७
६)आश्रम शाळा  :-   ०८
७)औद्योगिक प्रशिक्षण संस्था :-०३
८) वस्तीगृहे:-९१
९) प्रशासकीय कार्यालये :-७
१०)इतर :-  ५७
एकूण :- ७६९

🔸विद्यार्थी संख्या
 रयत शिक्षण संस्थेचे एकूण पाच विभाग असून, त्यामध्ये खलील प्रमाणे विद्यार्थी संख्या आहे.
१) मध्य विभाग:- १,३०,३८०
२) दक्षिण विभाग:-  ५९,४७०
३) उत्तर विभाग:-  १,३१,५४४
४) पश्चिम विभाग:- ८१,१७२
५) रायगड विभाग:-  ४१,४५९  
 एकूण :-४,४४,१३५                                यामध्ये २ लाख३५ हजार ५४ विद्यार्थी मागासवर्गीय असून, २ लाख ९ हजार ८१ विद्यार्थी  अमागासवर्गीय आहेत. म्हणजे ५३ टक्के मागासवर्गीय विद्यार्थी आणि ४७ टक्के अमागासवर्गीय विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत.

🔸सेवक
१) महाविद्यालये :- २,३७४
२) माध्यमिक विद्यालये:-९,४४४
३) अध्यापक विद्यालये:- ४७
४) प्राथमिक विद्यालये:- ३९३
५)पूर्व प्राथमिक विद्यालये:-२७६
६) आश्रम शाळा:-२२९
७)औद्योगिक प्रशिक्षण संस्था :-०६
८) वसतिगृहे:- ४२
९) प्रशासकीय कार्यालये :-१४९
१०) इतर :- ०५
एकूण :- १२,९६५
     
🔸रयत शिक्षण संस्थेची घटना
🔹१) जनरल बॉडी (General Body)
   रयत शिक्षण संस्थेची सर्वोच्च बॉडी म्हणजे जनरल बॉडी होय. या जनरल बॉडीत सध्या २७१ सदस्य आहेत. त्यामध्ये १७४ कार्यकर्ते, ५० निवृत्त आजीव सभासद,  ४७ विद्यमान आजीव सभासद आहेत.

▪️संस्थेचे अध्यक्ष (President)
 खासदार शरदचंद्र पवार यांची अध्यक्ष म्हणून नुकतीच तीन वर्षासाठी संस्थेच्या जनरल बॉडीने बिनविरोध फेरनिवड केलेली आहे .

▪️उपाध्यक्ष (Vice President)
१) प्रा. एन. डी. पाटील
२) मान. गणपतराव देशमुख
३) सौ. जयश्री चौगुले
४)श्री. अरुण कडू पाटील
५)श्री. पी. जे. पाटील
६) आ.चेतन विठ्ठल तुपे
यांची तीन वर्षासाठी नुकतीच बिनविरोध निवड झालेली आहे

▪️ सचिव (Secretary)
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी (नवी मुंबई) येथील प्राचार्य डॉ. विठ्ठल सुबराव शिवणकर यांची जनरल बॉडीने तीन वर्षासाठी नुकतीच सचिव म्हणून निवड केलेली आहे.

 संस्थेची घटना दुरुस्ती आणि आणि धोरणात्मक निर्णय घेण्याचे काम ही जनरल बॉडी करते. जनरल बॉडीची सभा प्रत्येक वर्षी ९ मे रोजी आयोजित केली जाते. चालू वर्षी कोरोनामुळे ही सभा ९ मे रोजी होऊ शकली नाही. ती २७ जून २०२० रोजी घेण्यात आली आणि पुढील तीन वर्षासाठी नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी या सभेत करण्यात आल्या.

🔹२) मॅनेजिंग कौन्सिल (Managing Council)
जनरल बॉडी मधून सचिव यांच्या सह २५ सदस्यांची मॅनेजिंग कौन्सिल तीन वर्षासाठी नुकतीच बिनविरोध करण्यात आलेली आहे.
▪️अ) कार्यकर्ते व संस्था हितचिंतक
जनरल बॉडीवर असणाऱ्या १७४ हितचिंतक व कार्यकर्त्यांमधून  तेरा व्यक्तींची जनरल बॉडीने  तीन वर्षासाठी नुकतीच मॅनेजिंग कौन्सिलवर बिनविरोध निवड केलेली आहे. ती खालील प्रमाणे:-
१) डॉ.अनिल आप्पासाहेब पाटील
२) ॲड. भगीरथ निवृत्ती शिंदे
३) ना. दिलीप दत्तात्रय वळसे पाटील
४) ना. अजित अनंतराव पवार
५) श्री. रामशेठ चांगू ठाकूर
६) ॲड.रवींद्र केशवराव पवार
७) श्रीमती मिनाताई माणिकराव जगधने
८) ना. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
९) श्री. प्रभाकर कृष्णाजी देशमुख
१०) श्री. दादाभाऊ दशरथ कळमकर
११) श्री. बाबासाहेब सहादु भोस
१२) श्री. मुमताजअली बाबुमियाँ शेख
१३) डॉ. यशवंत थोरात

▪️ब) निवृत्त आजीव सदस्य (Retired Life Members)
 रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी वर सन १९७६ पूर्वी नियुक्त झालेले ५० निवृत्त आजीव सदस्य आहेत. त्यांच्यातून खालील दोघांना मॅनेजिंग कौन्सिलवर बिनविरोध घेण्यात आले आहे
१) प्रिं.रामचंद्र ज्ञानेश्वर गायकवाड
२) श्री. कृष्णराव कबाजीराव घाटगे

▪️क) आजीव सदस्य(Life Member)

 सध्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल वाडीवर ४७ विद्यमान आजीव सदस्य आहेत. त्यांच्यामधून पुढील सहा सदस्यांना तीन वर्षासाठी मॅनेजिंग कौन्सिलवर बिनविरोध नियुक्त केलेले आहे.
१) प्रिं.डॉ. भारत तायाप्पा जाधव
२) प्रिं.डॉ. शिवलिंग गंगाधर मेनकुदळे
३) श्री. चंद्रकांत धोंडीबा वाव्हळ
४) प्रिं.डॉ.भाऊसाहेब किसन कराळे
५) श्री. विलास मारुती महाडिक
६) प्रिं. डॉ. गणेश अनंत ठाकूर

▪️ड) आजीव सेवक( Life Worker)
संस्थेमध्ये एकूण ५६ आजीव सेवक आहेत त्यामधून तीन आजीव सेवकांची नुकतीच मॅनेजिंग कौन्सिलवर निवड करण्यात आलेली आहे. ती पुढील प्रमाणे:-
१) श्री. अँथोनी ॲलेक्स डिसोझा
२) श्री. तुकाराम पांडुरंग कन्हेरकर
३) प्रिं. डॉ.काळूराम गेनूभाऊ कानडे
 किमान तीन महिन्यातून एकदा मॅनेजिंग कौन्सिल ची सभा बोलवून संस्थेचे धोरणात्मक आणि आर्थिक विषय त्यामध्ये चर्चिले जातात.

🔸 कार्यकारी मंडळ (Executive Committee)

 संस्थेच्या तातडीच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी कार्यकारी मंडळाची घटनेमध्ये तरतूद करण्यात आली असून, या मंडळाचे दरमहा किमान एक बैठक घेतली जाते.
या मंडळाची रचना पुढील प्रमाणे असते:-
१) चेअरमन
२)  व्हॉइस चेअरमन
३) मॅनेजिंग कौन्सिलचे चार सदस्य
४) मॅनेजिंग कौन्सिलचे काही निमंत्रित सदस्य
५) संस्थेचे सचिव

🔸 आजीव सदस्य मंडळ (Life Member Board)
रयत सेवकांच्या मधून ५० सेवकांचे  एक आजीव सदस्य मंडळ  तयार केले जाते. आजीव सदस्य होण्यासाठी रयत सेवकाला संस्थेच्या विशिष्ट अटी पूर्ण कराव्या लागतात. हे मंडळ संस्थेच्या कारभारासाठी मॅनेजिंग कौन्सिलला शिफारशी करते. या मंडळातून सहा प्रतिनिधी मॅनेजिंग कौन्सिल वर पाठवले जातात.

🔸 उच्च शिक्षण समिती (Higher Education Committee)
उच्च शिक्षण विभागातील बदल्या, नेमणुका,विकास कामे आणि आर्थिक व्यवहार यावर विचार विनिमय करण्यासाठी या समितीची निर्मिती करण्यात आलेली आहे.
रचना
१) चेअरमन
२) व्हॉइस चेअरमन
३) संस्थेचे सचिव, माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव, संस्थेचे ऑडिटर व ४३ महाविद्यालयाचे प्राचार्य.
४) मॅनेजिंग कौन्सिलचे  दोन सदस्य.
५) शिवाजी, पुणे, मुंबई आणि सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक सेवाजेष्ठ महाविद्यालयीन शिक्षक.
६) वरील चार विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक कार्यालयीन सेवक.
७) उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव हे या समितीचे पदसिद्ध सचिव असतात.

🔸 समन्वय समिती (Co-Ordination Committee)
संस्थेच्या माध्यमिक विभागातील बदल्या, नेमणुका, विकास कामे आणि आर्थिक व्यवहार यावर चर्चा करण्यासाठी संस्थेच्या घटनेत समन्वय समिती गठीत केलेली आहे.
रचना:-
१) चेअरमन
२) व्हाईस चेअरमन
३) संस्थेचे सचिव, संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव, ऑडिटर, संस्थेच्या पाच विभागाचे विभागीय अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक विभागीय अधिकारी.
४) संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे दोन सदस्य.
५) संस्थेच्या पाचही विभागाचे विभागीय अध्यक्ष.
६)  आजीव सदस्य मंडळातील सहा प्रतिनिधी.
७) आजीव सेवक मंडळातील पाच प्रतिनिधी.
८) संस्थेच्या मुख्याध्यापकांमधून त्यांचे चार प्रतिनिधी.
९) विभागवार शिक्षकांचे प्रतिनिधी.
१०) संस्थेच्या जनरल बॉडी सदस्‍यातून पंचवीस निमंत्रित सदस्य.
११) संस्थेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव हे या समन्वय समितीचे पदसिद्ध सचिव  असतात.

🔸 आजीव सेवक मंडळ (Life Worker)
रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांमधून विशिष्ट अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या सेवकाला आजीव सेवक ( लाइफ वर्कर) करून घेतले जाते. आजीव सेवक मंडळात ६० सदस्य असतात.  त्यांच्यातून तीन सदस्य मॅनेजिंग कौन्सिल वर पाठवले जातात.

🔸 अध्यक्ष आणि चेअरमन यातील फरक.

१) रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे अध्यक्ष हे संस्थेचे अध्यक्ष असतात. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे सध्या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
२) संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे चेअरमन हे संस्थेचे चेअरमन असतात. डॉ. अनिल पाटील हे संस्थेचे चेअरमन आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखन - प्रा. तुकाराम दरेकर- निवृत्त प्राध्यापक व प्र. प्राचार्यआणि ४२ वर्षे रयत सेवक.
                                          रयत शिक्षण संस्था, सातारा

1 comment: