Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday 12 March 2017

आमचे विद्यालय

विद्यालयाबद्दल  


                  शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने प्रभावित होऊन विंचूर पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमींनी या विद्यालयाची स्थापना ९ जून १९५९ रोजी केली. सुरवातीला या विद्यालयात ८ वी चा वर्ग सुरु होऊन ४९ विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यावेळी श्री.भोसले जी.ए. हे मुख्याध्यापक होते. आज विद्यालयात ५ ते १२ वी चे वर्ग सुरु आहे. एकूण ४० तुकड्यांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात २५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. तसेच या विद्यालयात जोडून प्राथमिक विभाग आहे. तसेच विद्यालयात ५ वी ते १० वी अखेर सेमीइंग्रजी च्या प्रत्येकी २ तुकड्या आहेत तसेच संस्थेच्या गुरुकुल प्रकल्पाची प्रत्येकी १ तुकडी आहे. विद्यालयात एकूण ८० सेवक कार्यरत आहे त्यापैकी माध्यमिक विभागात ५४, उच्च माध्यमिक १६ व शिक्षकेतर १० या सर्व सेवकांच्या प्रयत्नातून विद्यालयाची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व सेवक प्रयत्न करत आहोत. शाखेचा एस.एस.सी.व व एच.एस.सी. परीक्षेचा निकाल दरवर्षी उंचावत आहे. विद्यालयातील विद्यार्थी एन.टी.एस., एम.टी.एस., आर.टी.एस. कर्मवीर विद्याप्रबोधिनी, नवोदय, स्कॉलरशीप, शासकीय चित्रकला स्पर्धा, गांधी रिसर्च फौंडेशन परीक्षेची तयारी करून घेणेसाठी जादा तास घेतले जातात. विद्यालयातील विद्यार्थाना वक्तृत्व, निबंध, क्रीडा इ. स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. इ. १० वी साठी सकाळ अभ्यासिका, जादा तास, साप्ताहिक चाचण्या, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे व्याख्यानमाला इ.उपक्रम राबवले जातात. यातून विद्यालयाची प्रगती उंचावण्याचा प्रयत्न असतो. सध्या संगणकाचे युग असल्याने विद्यार्थ्यांना संगणकचे ज्ञान व्हावे यासाठी विद्यालयात संगणक प्रयोगशाळा व केंद्र सरकार पुरस्कृत आय.सी.टी. lab आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थी संगणक हाताळतात. तसेच विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे आहे. दरवर्षी शाळा पातळीवर विज्ञान प्रदर्शन भरविले जाते. त्यातून निवड झालेले उपकरणे तालुका पातळीवर पाठवले जातात. विद्यालयास भव्य अशी इमारत असून विद्यालयाच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनास स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष व सदस्य सहकार्य करत असतात. तसेच ग्रामपालिका विंचूर सरपंच, उपसरपंच, सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी माजी विद्यार्थी शिक्षणप्रेमी ग्रामस्थ वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करत असतात. 

जय कर्मवीर !!!  


शाळेचे नाव : कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय विंचूर

पत्ता : मु.पो. विंचूर ता.निफाड जि.नाशिक पिन.४२२३०५

माहिती अधिकारी : मा.प्राचार्य. श्री.कापडणीस पी.टी.

अपिलीय अधिकारी : मा.शिक्षणाधिकारी साहेब (माध्यमिक) जि.प. नाशिक

शाळेचा फोन नंबर :    ०२५५०-२६१२५७

स्थापना :   ०९.०६.१९५९

Email : vinchur.kbpvnr@gmail.com

U-dise Code : 27201012807

S.S.C.No : S-13.08.015

H.S.C. No. :J-13.08.022

 

 

 

No comments:

Post a Comment