Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday 22 September 2017

कर्मवीर जयंती सोहळा

२२ सप्टेंबर २०१७ :- १३० वी कर्मवीर जयंती सोहळा

आजच्या तरुणांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची गरज- न्यायाधीश रामकृष्ण चव्हाण

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रथम विद्यालयाचे सल्लागार समिती सदस्य श्री. सुनिल मालपाणी, श्री.पंढरीनाथ दरेकर, श्री.नारायणे गुरुजी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर गावातून कर्मवीरांच्या प्रतिमेची ढोल – ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध समाजप्रबोधनपर देखावे दाखविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने लेझीम पथक, कलशधारी विद्यार्थिनी, वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी, टिपरी व लोकनृत्य, सर्व धर्म समभाव, अंधश्रद्धा निर्मुलन, कमवा व शिका, विविध देशभक्त, इंधन वाचवा, मंगळसूत्र दान, स्वच्छता अभियान अशा विविध देखावे, रथ व नृत्यांचा समावेश होता.
            मिरवणुकीनंतर जयंतीसोहळा निमित्त सभेचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री.काकासाहेब गुंजाळ होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.साळुंके ए.पी. यांनी केले तर विद्यालयाच्या प्रगतीचा व विकासाच्या अहवालाचे वाचन प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. यांनी केले. यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०१६.१७ मध्ये झालेल्या विविध परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यानंतर कर्मवीरांच्या जीवनावर इयत्ता १ ली तील विद्यार्थिनी कु.आर्या जगताप,  इ.५ वी तील कु.शरयू पवार व इयत्ता १० वी तील विद्यार्थिनी कु.चंदन जाधव यांनी आपले विचार मांडले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व विद्यालयाचे माजी विद्यार्थी मा.रामकृष्ण धोंडीराम चव्हाण – दिवाणी न्यायाधीश वसई, यांनी आजच्या तरुणांना कर्मवीरांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले. ध्येय्य निश्चित करून यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत घेण्याचे आवाहन केले. विद्यालयाच्या आगामी नवीन इमारत बांधकामासाठी त्यांनी ५१००० रुपयांची  देणगी जाहीर केली. त्याचबरोबर विद्यालयाचा माजी विद्यार्थी भारत-चीन सीमेवर असलेला मोरे अनिल लक्ष्मण – पॅरा कमांडो याने देखील विद्यालयास ११००० रुपयांची  देणगी विद्यालयास जाहीर केली. शेवटी आभार प्रदर्शन उपशिक्षिका श्रीम.निकम एस.व्ही. यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री.चांदे आर.के. व श्री.पाटील जे.पी. यांनी केले. या कार्यक्रमास विंचूर ग्रामपंचायत सरपंच सौ.ताराबाई क्षिरसागर, पंचायत समिती सदस्य श्री.संजय शेवाळे, स्थानिक सल्लागार समिती सदस्य श्री.बाळकिसन मालपाणी, श्री.रामदास चव्हाण, श्री. सुनिल मालपाणी, श्री.पंढरीनाथ दरेकर, श्री.नारायणे गुरुजी व श्री.शांताराम दरेकर, यशोदीप काशीकर, संजय शिरसाठ, के.के.जेऊघाले, नरसिंह दरेकर, शंकर दरेकर, बाबुराव म्हसकर, पठाण सर, धोंडीराम चव्हाण, दिनकर चव्हाण, कापसे साहेब, डॉ.सालगुडे, सौ.संगीता सोनवणे, श्री.पी.के.जेऊघाले, सौ.सुजाता सांगळे, वंदना कानडे,  ज्ञानेश्वर जाधव, राजाराम दरेकर, विनायक जेऊघाले, बागुल सी.जी., महाजन सर इ. मान्यवर उपस्थित होते.




























































2 comments:

  1. शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांच्या घरात पोहचवणारे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
    ~~~~~ श्री खैरनार एस एस(विंचुर)

    ReplyDelete