Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday 7 July 2017

वृक्षदिंडी व वृक्षारोपण

वृक्षदिंडी व वृक्षारोपण

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात जुलै महिन्यातील पहिला सप्ताहात शासन निर्णयानुसार वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. प्रथम गावातून वृक्ष लागवड व संवर्धन याविषयी जनजागृती होण्यासाठी विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा, कलश, वृक्षांची रोपे, घोषणा फलक व ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक संपन्न झाली. यानंतर विद्यालय परिसरात स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.काकासाहेब गुंजाळ, उपाध्यक्ष श्री. कैलासशेठ सोनवणे व सदस्य श्री.गोपीनाथ ढवण, श्री.रामदास चव्हाण, पत्रकार श्री.डी.बी.काद्री, श्री.किशोर पाटील, श्री. घायाळ तसेच ग्रामस्थ श्री.विनायक जेऊघाले, श्री.विष्णू मवाळ विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी., पर्यवेक्षक पगार एस.पी. व शिक्षकवृंद , विद्यार्थी यांचे हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीच्या सर्व सदस्यांनी विद्यालयाचे प्राचार्य व सेवकवृंदास या वृक्षांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.



















No comments:

Post a Comment