Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday 19 July 2018

माता पालक संघ

माता पालक संघ

 विंचूर विद्यालयात माता पालक संघाची स्थापना..........

उपाध्यक्षपदी सौ.प्रीती संतोष कल्याणकर यांची निवड
                         विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठीची माता पालक संघाची स्थापना करण्यात आली. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील उपशिक्षिका सौ.खरात एस.ए. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संघाच्या सचिव श्रीम.कुलकर्णी व्ही.एस.यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व माता पालक शिक्षक संघाच्या स्थापनेचा हेतू, उद्दिष्ट्ये स्पष्ट केली. विद्यालयाचे प्राचार्य पोफळे जी.जी. यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची निवड करण्यात आली. माता पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य पोफळे जी.जी. , उपाध्यक्ष सौ.प्रीती संतोष कल्याणकर , सहसचिव सौ.सुवर्णा संतोष कांगणे व सौ.शितल उमेश ढवण तसेच सदस्य म्हणून सौ.शितल संतोष नेवगे यांची निवड करण्यात आली. याचबरोबर मागील वर्षातील कार्यकारिणीचे आभार व्यक्त करण्यात आले व नवीन कार्यकारिणीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.  विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीम.नागणे बी.आर. यांनी विद्यालयातील विविध उपक्रम, विविध परीक्षांचे निकाल व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलची माहिती पालकांना दिली. तसेच श्रीम.जोशी यांनी शिक्षक प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ.पाटील ए.सी. यांनी आभार मानले
 
 




























No comments:

Post a Comment