Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 16 July 2018

वृक्षदिंडी - वृक्षारोपण

वृक्षदिंडी - वृक्षारोपण

दिनांक :- १६.७.२०१८                            वार :- सोमवार


विंचूर विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.............
                   विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शासन निर्णयानुसार वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. प्रथम गावातून वृक्ष लागवड व संवर्धन याविषयी जनजागृती होण्यासाठी विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा, कलश, वृक्षांची रोपे, घोषणा फलक व ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक संपन्न झाली. यानंतर विद्यालय परिसरात स्थानिक स्कूल सदस्य श्री.माधवराव नारायणे (गुरुजी), विद्यालयाचे प्राचार्य श्री.पोफळे जी.जी., उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी., पर्यवेक्षक पगार एस.पी. उपशिक्षक श्री.पाटील के.डी., श्री.म्हस्के ए.जे., शिक्षकवृंद , व विद्यार्थी यांचे हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन हरितसेना प्रमुख श्री.बोरसे एन.बी. यांनी केले.
 
 














No comments:

Post a Comment