Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 11 August 2017

माता पालक संघ



विंचूर विद्यालयात माता पालक संघाची स्थापना..........
उपाध्यक्षपदी सौ.सुजाता सुदाम सांगळे यांची निवड
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठीची माता पालक संघाची स्थापना करण्यात आली. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघाचे सचिव श्रीम.कुलकर्णी व्ही.एस.माता पालक शिक्षक संघाच्या स्थापनेचा हेतू व उद्दिष्ट्ये स्पष्ट केली. विद्यालयाचे प्राचार्य कापडणीस पी.टी.यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची निवड करण्यात आली. माता शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य कापडणीस पी.टी. , उपाध्यक्ष सौ.सुजाता सुदाम सांगळे , सहसचिव सौ.अरुणा महेश राऊत व सौ.दिपाली शाम धुमाळ तसेच सदस्य म्हणून सौ.विद्या पुरुषोत्तम शिरसाठ यांची निवड करण्यात आली. याचबरोबर मागील वर्षातील कार्यकारिणीचे आभार व्यक्त करण्यात आले व नवीन कार्यकारिणीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.  विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीम.मानकर एस.बी. यांनी विद्यालयातील विविध उपक्रम, विविध परीक्षांचे निकाल व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलची माहिती पालकांना दिली. शेवटी विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीम.काळे जे.व्ही यांनी आभार मानले.











No comments:

Post a Comment