Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday, 15 August 2017

स्वातंत्र्यदिन सोहळा १५ ऑगस्ट

स्वातंत्र्यदिन सोहळा १५ ऑगस्ट.



विंचूर विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..............
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष मा.श्री.काकासाहेब गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच स्काऊट गाईड व एमसीसी संचलन द्वारे ध्वजास मानवंदना देण्यात आली. नंतर स्वच्छ भारत मिशन निमित्ताने स्वच्छतेची शपथ सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी घेतली. यानंतर गावातून विविध घोषणा व ढोलताशांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. या कार्यक्रमास स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष श्री.कैलास सोनवणे, व सदस्य श्री.गोपीनाथ ढवण, नारायणे गुरुजी, जगदीश जेऊघाले, रामदास चव्हाण, पंढरीनाथ दरेकर व ग्रामस्थ दिनकर चव्हाण, विनायक जेऊघाले, के.के.जेऊघाले, शांताराम दरेकर, नरसिंह दरेकर, ज्ञानेश्वर दरेकर, ज्ञानेश्वर सोनवणे, सतीश शेलार, आरगडे, राजाराम दरेकर उपस्थित होते. 

















































No comments:

Post a Comment