Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 12 January 2018

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती 

(राष्ट्रीय युवा दिन )          दिनांक : १२ जाने.२०१८


विंचूर विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी........

               विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन) उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सकाळ सत्रात पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी. यांच्या अध्यक्षतेखाली उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थिनीनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.प्रीती गोरे या विद्यार्थिनीने केले. कडलग विराज, शुभम खैरे, वेद कुमावत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कु.जाधव पूनम, भवर सिमा यांनी कविता वाचन केले. याप्रसंगी कु.नवले दामिनी या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारत एकांकिका सादर केली. कु.पठाडे तेजश्री हिने सूत्रसंचालन व कु.नारायणे चैताली हिने आभार प्रदर्शन केले. विद्यालयातील प्राध्यापक श्री.पवार टी.ए. यांनी युवा दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सकाळ सत्रातील सर्व सेवक, उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.




















No comments:

Post a Comment