विंचूर विद्यालयातील विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवर क्रीडा स्पर्धेसाठी निवड.....
विंचूर
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांनी क्रिडा युवा
संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत नाशिक येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय
शालेय तेंग सुडो स्पर्धेत यश संपादन केले. यामध्ये सुरज गरड, सुरज गलांडे,
हरी साताळे, शुभम दरेकर, सचिन रांधवन, कीर्ती देसले, सिद्धार्थ साटोटे,
अनिकेत गुजर, निकिता घायाळ, मोनिका दरेकर या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय
स्पर्धेत यश संपादन करून विभागीय पातळीवर जाण्याचा बहुमान मिळवला त्याबद्दल
विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण,
पर्यवेक्षक व्ही.व्ही. मापारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी
अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment