विंचुर विद्यालयात संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथी साजरी.....
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक प्रविण ढवण होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. त्यानंतर सोनल आव्हाड, शुभम सोनवणे, वैभवी पवार, यश आघाव, तेजस्विनी थोरात या विद्यार्थ्यांनी गाडगे महाराजांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.श्रुती काळे हिने केले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक वर्पे सर, पी.बी.आहेर, एन.ए.पवार, ए.एस.पवार, श्रीम.एस.व्ही.गंधे, सौ.के.एम. निकम, जे.पी.पाटील, पी.ए.सरोदे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment