मानसोपचार तज्ञ व्याख्यान मानसोपचार :- डॉ.किशोर चौधरी
विंचूर विद्यालयात मानसोपचारतज्ञ व्याख्यान संपन्न...............
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यसंबंधी डॉक्टर किशोर चौधरी (M.D.Hom) यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान संपन्न झाले. विविध मानसिक आजार, अनाहूत भीती, नैराश्य, व्यसनाधीनता, आहार व जीवनशैली सुधारून मनस्थितीत सुधारणा कशी करावी इ.बाबत डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपप्राचार्य प्रविण ढवण होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक आर.के.चांदे यांनी केले. सूत्रसंचालन एस.जे.बागुल यांनी तर आभार प्रदर्शन के.जी.जोपळे यांनी केले. याप्रसंगी पर्यवेक्षक व्ही.व्ही.मापारी, एस. एम.पवार, पी.ए.सरोदे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment