विंचूरला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
सध्या सगळ्याच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. त्यात टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्याथ्यांमध्ये खूप सारे टॅलेंट आहे, ते ओळखून प्रशासकीय सेवांमध्ये यश संपादन करुन तरुणांनी समाज परिवर्तनाच्या माध्यमातून समाजाचे क्रण फेडावे असे आवाहन प्रा.कपिल हांडे यांनी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात पत्रकार संघ, द युनिक अँकंडमी पुणे, लखनमैय्या कर्पे मित्र मंडळ आणि आदर्श कॅम्प्युटर्सच्या वतीने मोफत करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी प्रा. हांडे बोलत होते. युपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षा म्हणजे अनेकांच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट. या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विशिष्ट तंत्राने अभ्यास करायचा असतो. या परीक्षांना कशाप्रकारे सामोरे जायचं, त्यात यशस्वी कसं व्हायचं याबाबतच्या महत्वाच्या सूचना त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ तर प्रमुख अतिथी म्हणुन लासलगावचे स.पो.नि. शिवचरण पांढरे उपस्थित होते. पोलीस अधिकारी पांढरे यांनी विद्यार्थ्यांना लहाणपणापासूनच स्पर्धा परीक्षेविषयी गोडी निर्माण होण्यासाठी शाळेतील बिबिध स्कॉलरशिप परीक्षांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करुन जगात काय सुरु आहे यासाठी वृत्तपत्र वाचन व इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवरील बातम्या बघितल्यास त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षांसाठी होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेंद्र चांदे यांनी केले. यावेळी प्राचार्य जी.जी. पोफळे, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण,स्कुल कमेटीचे नारायणे गुरुजी, किशोर पाटील, डि.बी. काद्री, शरद महाजन, रणजित गुंजाळ, भाऊसाहेब हुजबंद, नितीन गायकवाड, प्रकाश जाजू ,जगन्नाथ जोशी, दिपक घायाळ, संदिप शिरसाठ, जितेंद्र गवळी, आबासाहेब दरेकर आदींसह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. संयोजकांनी बिंचूर परिसरात अशी मार्गदर्शन शिबीरे बेळोबेळी आयोजित करुन परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिबीराचा लाभ मिळवुन द्यावा अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment