Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 10 May 2019

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

विंचूर विद्यालयात सन १९९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न..

विंचूर- येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सन १९९८ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आनंदात संपन्न झाला. मेळाव्यास एकूण ६० माजी विद्यार्थी उपस्थित  होते. सुरुवातीस कर्मवीर भाऊराव पाटील व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थी व शिक्षक यांनी आपला परिचय करून दिला. सर्व विद्यार्थ्यांनी आलेल्या शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. विद्यालयाचे उपप्राचार्य प्रविण ढवण यांनी विद्यालयाची प्रगती, इतिहास व रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच आलेले माजी शिक्षक पी.के.जेऊघाले, बी.बी.मोकळ, पी.एस.गुजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय झाल्टे यांनी केले. तसेच आलेल्या माजी विद्यार्थ्यांतून अॅड सौ.सविता गुंजाळ, डॉ.शरद कातकाडे, डॉ.किशोर चौधरी, श्रीम.शितल बच्छाव यांनी विद्यालयातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्वांनी मिळून विद्यालयास रु.११,००० देणगी दिली त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. मेळावा संपन्न होण्यासाठी किरण दरेकर, रतन खांदोडे, संदीप जगदाळे, रवींद्र भगत, किरण जेऊघाले यांनी सहकार्य केले.






No comments:

Post a Comment