Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday 28 July 2019

पालक-शिक्षक संघाची स्थापना- उच्च माध्यमिक

विंचूर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक संघाची स्थापना- 

उपाध्यक्षपदी शंकर दरेकर यांची निवड...                

विंचूर, २७ जूलै- येथील कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठी शिक्षक पालक संघाची स्थापना व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. प्रारंभी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राध्यापक एस.डी.शिंदे यांनी पालक-शिक्षक संघाच्या स्थापनेचा हेतू, उद्दिष्टे आपल्या प्रास्ताविक व सूत्रसंचालनातून स्पष्ट केला. पालक -शिक्षक संघाच्या कार्यकारणीसाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य एन.ई.देवढे , उपाध्यक्ष- शंकर दरेकर, सचिव एस.एन.शेवाळे सर सहसचिव म्हणून सुनिल ताजणे व सौ.अरुणा राऊत यांची एकमताने निवड करण्यात आली. नवीन कार्यकारणीचे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डब्ल्यू.एन.घोडके, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक यु.बी.वर्पे,  प्राध्यापिका एस.व्ही. गंधे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक एस.एन.शेवाळे यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील विविध उपक्रम विविध परीक्षांचे निकाल व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलची माहिती पालकांना दिली. तसेच पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. तसेच प्राध्यापक एम.एन.क्षिरसागर, आर.टी.टिळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सभेस विनायक जेऊघाले, नारायण काळे, शांताराम काळे, प्रविण सालगुडे, केशव दरेकर, रविंद्र सोनवणे, अशोक नेवगे,अंजना वाघ, रेखा गिरमे, ग्रामस्थ, पालक व उच्च माध्यमिक सेवकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस.डी.शिंदे व आभार प्रदर्शन संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे यांनी केले .























No comments:

Post a Comment