Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 1 December 2019

शालेय विज्ञान प्रदर्शन व बाल आनंद मेळावा

*विंचूर विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन व बाल आनंद मेळावा संपन्न....*


                  विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विचारांना प्रेरणा देणे व व्यवहार ज्ञानाचे कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी शालेय विज्ञान प्रदर्शन व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, कर्मवीर आण्णा व ए.पी,जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी केले. त्यानंतर प्रमुख अतिथी विंचूर ग्रामपालिका सरपंच भास्करराव परदेशी, निफाड पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, संस्थेचे लाईफ वर्कर राजेंद्र चांदे व कार्यक्रमाचे अध्यक्ष  माधवराव नारायणे (गुरुजी) यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विज्ञान उपकरणे, खेळणी प्रदर्शन, पोस्टर प्रेझेंटेशन, वैज्ञानिक रांगोळी, बाल आनंद मेळावा इत्यादी उपक्रमांच्या कक्षांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सर्व विविध कक्षांमध्ये जवळपास २०० हून अधिक उपकरणे प्रदर्शनासाठी मांडण्यात आली होती. आनंद मेळाव्यासाठी एकूण ४८ स्टॉलमार्फत विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी मांडण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे याप्रसंगी मान्यवरांनी कौतुक केले. याप्रसंगी सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, ग्रामस्थ आबा दरेकर, पी.के.जेऊघाले, अशोक दरेकर, पर्यवेक्षक सतिश पगार, ज्ञानदेव जोरे, पालक, पत्रकार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  उपशिक्षक एस.व्ही.शिंदे, अमित वळवी, मुश्ताक शेख, काशिराम जोपळे, जयसिंग दरेकर, कचरू रोठे, संदीप वसावे., कैलास पारधी, उपशिक्षिका वैशाली दिघे, विद्या जोशी, जयश्री काळे, बालिका नागणे, क्रांती निकम, अरुणा पवार, अर्चना पवार, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भोसले यांनी तर आभार प्रदर्शन पंकज सरोदे यांनी केले.


































































































































No comments:

Post a Comment