*विंचूर विद्यालयात गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी.......*
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पायल वैराळ, अक्षदा पवार, कोमल दराडे, गायत्री जाधव, पुनम बुचकुले, श्रावणी थोरात, गायत्री डुंबरे, प्रीती कदम, पुजा काळे, शुभम सोनवणे, कोमल खांदोडे या विद्यार्थ्यांनी गाडगे महाराजांचे जीवन चरित्र, समाजकार्य, कीर्तनातून व प्रत्यक्ष कृतीतून समाजाला दिलेला स्वच्छतेचा संदेश आपल्या मनोगतातून व्यक्त केला. कु. सोनल आव्हाड हिने गाडगे महाराजांवर आधारित गीत गायन सादर केले. शिक्षक प्रतिनिधी जगदीश पाटील यांनी देखील संत गाडगेबाबांबद्दल मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक सुनिल शेवाळे, पोपट आहेर, उत्तम वर्पे, पंकज सरोदे, कैलास पारधी, अतुल चितुडकर, बालिका नागणे, जयश्री सोनवणे ज्योती शिंदे कैलास घंंगाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी तांदळे व आभार प्रदर्शन अमृता खांदोडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षिका अरुणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार देवढे, पर्यवेक्षक ज्ञानदेव जोरे, सतीश पगार व लाइफ वर्कर राजेंद्र चांदे यांनी अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment