राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती
*विंचूर विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन......*१२ जाने, विंचूर- येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती (राष्ट्रीय युवा दिन) उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले. त्यानंतर शुभम क्षिरसागर, दुर्गेश शिळमकर, कु.शितल जाधव, कु.कल्याणी सालगुडे यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे युवा प्राध्यापक जयसिंग दरेकर यांनी युवाशक्तीचे महत्व व शिवरायांच्या जडणघडणीत जिजाऊचे योगदान आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमास जेष्ठ प्राध्यापक पोपट आहेर, मच्छिंद्र क्षिरसागर, उत्तम वर्पे, सविता गायकवाड, सोनाली निकम जगदीश पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल मुदगुल व आभार प्रदर्शन दीपक कडलग याने केले.
No comments:
Post a Comment