नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
*विंचूर विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी..........*विंचुर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी शरयू भोसले, श्रुती डुंबरे, संस्कृती जेऊघाले, गायत्री जाधव, समीक्षा जाधव, आदिती जगदाळे, समीक्षा ढवण, निर्जला कडलग, आरती ठुबे, साहिल मेमाणे, आयुष साळी यांनी नेताजींच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके यांनी आझाद हिंद सेना व नेताजींचे कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रायणी शेलार व प्रणाली थोरात यांनी केले तसेच आभारप्रदर्शन साहिल दरेकर याने केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सादर केलेल्या या कार्यक्रमाचे विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे व सर्व सेवकवृंद यांनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment