Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday 16 July 2020

इ.१२ वी निकाल - २०२०


विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांचे १२ वी च्या परीक्षेत उज्ज्वल यश.......

            विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इयत्ता १२ वी फेब्रुवारी/मार्च २०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये विज्ञान विभागात एकूण १७६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १७४ विद्यार्थी पास झाले. विद्यालयाचा शेकडा निकाल ९८.८६ टक्के लागला. विद्यालयात विज्ञान शाखेत
प्रथम क्र. : - कु.गिते पूजा प्रभूशंकर – ८९.०८ %
द्वितीय क्र:- कु.कानडे ऋतुजा बाजीराव – ८८.४६ %
तृतीय क्र.:- कु.शिंदे निकिता हरीश्चंद व कु.कानडे स्वरूपा संजय – ८२.४६ % यांनी यश संपादन केले.
त्याचप्रमाणे कला विभागात एकूण १२० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १११ विद्यार्थी पास झाले. विद्यालयाचा शेकडा निकाल ९२.५० टक्के लागला. विद्यालयात कला शाखेत
प्रथम क्र.:- जाधव चेतन नानासाहेब – ८२.०० %
द्वितीय क्र. :- लांडबले किरण वाळूबा – ८०.३० %
तृतीय क्र.:-मळगुंडे सचिन लहानू – ७८.९२ % यांनी यश संपादन केले.
            वरील विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शक शिक्षकांचे स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिलभाऊ मालपाणी व नारायणे गुरुजी, सदस्य पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, बाळकिसन मालपाणी, जगदीश जेऊघाले, काशिनाथ शेवाळे, तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक डब्लू.एन.घोडके, पर्यवेक्षक एस.पी.पगार व डी.टी.जोरे., लाईफ वर्कर आर.के.चांदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment