Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 24 January 2023

करिअर जत्रा व स्काऊट गाईड आनंद मेळावा

 *विंचूर विद्यालयात करिअर जत्रा व स्काऊट गाईड आनंद मेळावा संपन्न..* 

रयत शिक्षण संस्थेच्या विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कर्मवीर करिअर क्लब अंतर्गत करिअर जत्रा व स्काऊट गाईड अंतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते करिअर जत्रेचे व आनंद मेळाव्याचे उद्घाटन संपन्न झाले. समुपदेशक प्राध्यापक बी. एम. बैरागी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना करिअर जत्रेचे व स्काऊट गाईड मेळाव्याचे उद्दिष्ट आणि महत्त्व स्पष्ट केले. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ यांनी आपल्या मनोगतातून करिअर मार्गदर्शनाचे महत्त्व सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वावलंबी झाले पाहिजे असा संदेश दिला. त्यानंतर सर्व मान्यवरांनी करिअर जत्रेत मांडलेल्या प्रत्येक स्टॉलला भेट देत वेगवेगळ्या करिअरची ओळख करून घेतली. एकूण 20 स्टॉल करिअर जत्रेत मांडले गेले. ज्यात दहावी, बारावीनंतर कोणती ज्ञान शाखा निवडावी, विज्ञान शाखेतील करिअर, कला शाखेतील करिअर, मेडिकल, इंजिनिअरिंग, संगणक शिक्षण, तांत्रिक क्षेत्र, व्यवस्थापन, औद्योगिक शिक्षण, कायदा, कृषी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन,  सेना दल व पोलीस दल, दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी करिअर, कला कौशल्य, अभ्यास कौशल्य, असे विविध स्टॉल विद्यार्थ्यांनी उभारले. उपस्थित मान्यवरांना व  सर्व विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींची ओळख करून दिली.  मान्यवरांनी आनंद मेळाव्यातील स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत त्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्याचा आनंद लुटला. सदर कार्यक्रमास उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिलभाऊ मालपाणी, सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य जगदीश जेऊघाले, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे, प्राचार्य एन. ई. देवढे, उपप्राचार्य आर. व्ही. शिंदे, पर्यवेक्षक के. जी. जोपळे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर आर. के. चांदे, स्काऊट गाईड प्रमुख एम.आय.शेख, एस.एन. शेवाळे, आर. टी. टिळेकर, बी. के. जाधव, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भक्ती दरेकर व साधना निकम यांनी केले.













No comments:

Post a Comment