Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 1 February 2023

26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन

 *विंचूर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय सैन्य दलातील विद्यालयाचा माजी विद्यार्थी धनंजय पोतले यांच्या हस्ते ध्वजपूजन व विद्यालयाचे प्राचार्य एन.ई. देवढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच स्काऊट गाईड चे ध्वजारोहण उपमुख्याध्यापक आर.व्ही. शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. एमसीसी संचलन द्वारे राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले व तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत शपथ घेण्यात आली. गावातून विविध घोषणा व ढोलताशांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, विंचूर ग्रामपंचायत सरपंच सचिन दरेकर, स्थानिक सल्लागार समिती सदस्य जगदीश जेऊघाले, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, तसेच सोमनाथ निकम, ज्ञानेश्वर गाडे, अमजद पठाण, पंढरीनाथ जेऊघाले, विनायक जेऊघाले, शंकरराव दरेकर, किशोर दरेकर, दिनकर चव्हाण, राजाभाऊ दरेकर, गंगाधर गोरे, संतोष जाधव, दिलीप चव्हाण, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रविण ढवण, एन.पी.गवळी, एस.के.आहेर, सी.जी.बागुल, पत्रकार नितीन गायकवाड सुनिल क्षिरसागर, दत्तात्रय दरेकर, आरती जाधव, स्वाती धात्रक, मालती जाधव तसेच विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, मान्यवर, माजी सेवक व माजी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे व उपशिक्षक व्ही.सी.भोसले यांनी केले.

















































No comments:

Post a Comment