Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 1 February 2023

राष्ट्रीय युवा दिन

 *विंचूर महाविद्यालयात करिअर डे उत्साहात साजरा..* 

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर येथे कर्मवीर करिअर क्लब व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन हा करियर डे म्हणून साजरा केला गेला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व चांदवड येथील फायर अँड सेफ्टी कॉलेजचे चेअरमन श्री.सुधाकर लोहारकर व प्राचार्य श्रीमती. आशुमती लोहारकर हे प्रमुख पाहुणे लाभले. प्राध्यापिका एस. व्ही. गंधे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर गवळी गायत्री सुरेश, नवले अश्विनी चांगदेव, मळगुंडे रोहिणी लहानू, घोटेकर धनंजय दत्तात्रय, मुद्गुल स्नेहल सोमनाथ, पोमणे पवन, पानसरे भाग्यश्री, साळवे श्रद्धा सुरेश, निकाळे कुणाल या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्राध्यापक आर. टी. टिळेकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाविषयी विविध प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात लोहारकर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य आर. व्ही. शिंदे, एस. एन. शेवाळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख बी. के. जाधव, एस. डी. शिंदे, एस. व्ही. निकम, एस. पी. गायकवाड, सी. व्ही. अहिरे, टी. ए. पवार, बी. एस. पाटील व सर्व शिक्षक वृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना निकम व लक्ष्मी मोहिते यांनी केले. तर समुपदेशक बी. एम.बैरागी यांनी आभार प्रदर्शन केले. माध्यमिक साठी वर्गशिक्षक यु.ए.सारुकते यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवीचे विद्यार्थी पल्लवी निकम, कार्तिकी दरेकर, दिव्या दरेकर,प्रणिता आहेर,सुजाता नागरे,स्नेहल नागरे,पायल निकम,पूजा बोडके,हरी क्षिरसागर,ऋतुजा काळे यांनी देखील कार्यक्रमात सहभाग दर्शविला. विद्यालयाचे प्राचार्य एन.ई. देवढे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.






No comments:

Post a Comment