Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 15 April 2023

रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील - पुण्यतिथी

 *विंचूर विद्यालयात रयतमाऊली लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन.......*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष निवडीची सूचना वेदांत जाधव याने मांडली व त्यास सायली शिंदे हिने सर्वानुमते अनुमोदन दिले. विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. सर्वप्रथम व्यासपीठावरील मान्यवरांनी लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेचे पूजन केले. स्नेहल जाधव हिने प्रास्ताविक केले. कल्याणी भडांगे, धनश्री पुंड, मयुरी मुदगुल, ओम जाधव, भक्ती चेवले, ख़ुशी सोनी, कार्तिकी डांगरे, समिक्षा चांदोरे या विद्यार्थ्यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या जीवन कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. लक्ष्मीबाई पाटील व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागातूनच रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रात उभी राहिली असे प्रतिपादन विद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक आर.टी.टिळेकर यांनी आपल्या मनोगताद्वारे केले. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी गोराडे व आभार प्रदर्शन भक्ती राऊत हिने केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन इयत्ता सातवी ड चे विद्यार्थी व वर्गशिक्षक ए.एच. पाटील यांनी केले.




No comments:

Post a Comment