Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 15 May 2023

पर्यवेक्षक ज्ञानदेव जोरे यांचा सेवापूर्ती सत्कार

 *विंचूर विद्यालयाचे पर्यवेक्षक ज्ञानदेव जोरे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न....*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे पर्यवेक्षक ज्ञानदेव जोरे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. सर्वप्रथम अध्यक्ष निवडीची सूचना आर.के.चांदे यांनी मांडली त्यास पंकज सरोदे यांनी अनुमोदन दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य जगदीश जेऊघाले होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा जोरे परिवारातर्फे शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सत्कार मूर्ती जोरे सर यांचा विद्यालय व सेवकवृन्दांच्या वतीने शाल, श्रीफळ, पोशाख व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. जोरे सरांनी आपल्या मनोगतातून सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ,  माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डी.एस. वडजे बापू, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, माजी मुख्याध्यापक जी.जी.पोफळे, डी.सी.शेंडे, के.एम.गवळी, एस.के.आहेर तसेच के.बी.दरेकर, डी.एन.खैरनार, अनारसे गुरुजी, समीर देवढे, ज्ञानेश्वर तासकर, माजी विद्यार्थी, माजी सहकारी, रुई येथील प्रतिष्ठ शिक्षणप्रेमी यांनी आपल्या मनोगताद्वारे जोरे सर यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, विनायक जेऊघाले, कोंडाजी गायकवाड, जगन्नाथ तासकर, पी.बी.चौरे, व्ही.व्ही. काकळीज, गुंजाळ सर, प्रविण ढवण, व्ही.सी.पगार, जी.एन.तेलोरे, सी.डी.रोटे, डब्लू.एन.घोडके, सोमनाथ निकम, आबासाहेब दरेकर, एन.पी.गवळी, सी.के.ठाकरे, बिपीन गवळी, रावसाहेब पोटे, शिवाजी रोटे, गंगाराम रोटे, एकनाथ रोटे, राम रोटे, धीरज पवार, आप्पासाहेब शिंदे, अंकुश तासकर, बबनराव गायकवाड, जे.पी.पाटील, एरंडे सर, राम चितोडकर, स्वाती तासकर, पिंटूभाऊ तासकर, बाळासाहेब रोटे, निवृत्ती जोरे, योगेश जोरे, तुषार जोरे, सरला बैरागी, आबासाहेब डोंगरे, ताराबाई जोरे, भास्करराव पवार, शेषराव मापारी, लहानबाई पानगव्हाणे, जोरे सरांचे नातेवाईक, आप्तेष्ट, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, विद्यालयाचे पर्यवेक्षक के.जी.जोपळे, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे व आभार प्रदर्शन व्ही.सी.भोसले यांनी केले.




































































No comments:

Post a Comment