Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday 21 July 2017

शिक्षक पालक संघाची स्थापना



विंचूर विद्यालयात शिक्षक पालक संघाची स्थापना..........

उपाध्यक्षपदी श्री.संजय विठ्ठल शिरसाठ यांची निवड
 विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठीची शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघाचे सचिव श्री.गवळी एन.पी. यांनी पालक शिक्षक संघाच्या स्थापनेचा हेतू व उद्दिष्ट्ये स्पष्ट केली. उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य श्री.नारायणे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची निवड करण्यात आली. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य कापडणीस पी.टी. , उपाध्यक्ष श्री.संजय विठ्ठल शिरसाठ, सहसचिव सौ.सीमा महाले व श्री.ज्ञानेश्वर सोनवणे तसेच सदस्य म्हणून सौ.सुनिता जाधव व यशोदीप काशिकर यांची निवड करण्यात आली. याचबरोबर मागील वर्षातील उपाध्यक्ष श्री.विष्णू मवाळ व सहसचिव सौ.वैशाली जाधव यांचे आभार व्यक्त करण्यात आले व नवीन कार्यकारिणीचे विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी., उपमुख्याध्यापक श्री.लाटे. डी.सी. व पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी. यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.  यानंतर विद्यालयातील गुरुकुल प्रमुख श्री.निकम एम.एस. यांनी गुरुकुल प्रकल्पाविषयी सखोल माहिती दिली. विद्यालयाचे उपशिक्षक श्री.गाडेकर एस.पी. यांनी विद्यालयातील विविध उपक्रम, विविध परीक्षांचे निकाल व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलची माहिती पालकांना दिली. तसेच विद्यालयाचे उपशिक्षक श्री.चांदे आर.के. यांनी पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. यानंतर पालक प्रतिनिधी श्री.विनायक महाले यांनी पालकांना विद्यालयास सहकार्य करण्याचे आव्हान केले. या सभेस श्री.आबा दरेकर, श्री.दौंड भाऊसाहेब, श्री.ज्ञानेश्वर दरेकर व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.शेवटी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. ढवण पी.जी. यांनी आभार मानले..









No comments:

Post a Comment