Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 16 July 2017

गुरुपौर्णिमा १०.७.२०१७

गुरुपौर्णिमा १०.७.२०१७



विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी या नियोजन केले. प्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. यांनी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यानी सर्व सेवकांचे औक्षण केले व भेटवस्तू दिल्या. यानंतर विद्यालयातील विद्यार्थी कु.सानिया पठाण, कु.दीक्षा वाघ, कु.श्रुती काळे, शुभम सोनवणे, कु.वैभवी पवार, कु. मानसी अढांगळे, कु.ऋतुजा कानडे, कु.प्रियंका कानडे, कु.स्वरूपा कानडे यांनी आपल्या मनोगतातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. तसेच विद्यालयातील पर्यवेक्षक श्री.साळुंके ए.पी. व जेष्ठ शिक्षक श्री.गवळी एन.पी. यांनी गुरुपौर्णिमा का साजरी करतात याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.चंदन जाधव हिने केले व आभार प्रदर्शन कु.श्रुती काळे हिने केले.
















No comments:

Post a Comment