Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday, 9 October 2018

2 ऑक्टोबर :- म. गांधी जयंती

2 ऑक्टोबर :- महात्मा गांधी जयंती

विंचूर विद्यालयात गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी ....

                    विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता आठवी अ च्या वर्गाने  केले. याप्रसंगी सर्वप्रथम अध्यक्ष निवडीची सूचना कुमारी साक्षी जेऊघाले हिने मांडली. त्यास तृप्ती जाधव हिने सर्वानुमते अनुमोदन दिले. त्यानंतर प्रतिमापूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक व्ही.व्ही. मापारी व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.  विद्यालयातील जोएफ शहा, श्रेया साळुंके, समृद्धी कडलग, सत्यम सोनवणे, आम्रपाली उबाळे, हरी साताळे या विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे आपले विचार मांडले. ज्येष्ठ शिक्षक के.जी. जोपळे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणानंतर आभार प्रदर्शन आदित्य जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती दरेकर व वैष्णवी सालगुडे यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्य जी.जी. पोफळे उपप्राचार्य पी.जी. ढवण, पर्यवेक्षक एस.पी. पगार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.





























No comments:

Post a Comment