Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday, 9 October 2018

शताब्दी महोत्सव आयोजन

रयत शिक्षण संस्था :- शताब्दी महोत्सव आयोजन

दिनांक :- ०५/१०/२०१८ ते ११/१०/२०१८

विंचूर विद्यालयात शताब्दी महोत्सवाचे आयोजन ......
कर्मवीर भाऊराव पाटील स्थापित रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विंचूर येथे दिनांक 5/10/2018 ते 11/10/2018 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य जी जी पोफळे यांनी दिली 
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे:- 1) सर्वप्रथम शुक्रवार दिनांक 5/10/ 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता शताब्दी व शाखा फलकाचे अनावरण स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली व माजी पंचायत समिती सदस्य निफाड राजाराम बाबुराव दरेकर व माजी सरपंच ग्रामपालिका विंचूर अविनाश दुसाने यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्या सौ किरण ताई थोरे यांच्या हस्ते होणार आहे. 
2) शनिवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी भव्य चित्ररथ मिरवणूक होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन  संजय शेवाळे पंचायत समिती सदस्य निफाड यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष माधवराव नारायण सल्लागार समिती सदस्य उत्तर विभाग अहमदनगर, प्रमुख अतिथी आत्माराम दरेकर सदस्य ग्रामपालिका विंचूर कैलास सोनवणे उपाध्यक्ष स्थानिक सल्लागार शिक्षण समिती असणार आहेत. 
3) रविवार 7 ऑक्‍टोबर रोजी शालेय विज्ञान प्रदर्शन असून या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ ताराबाई क्षीरसागर सरपंच ग्रामपंचायत विंचूर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष श्री सुनील मालपाणी सल्लागार समिती सदस्य उत्तर विभाग अहमदनगर, प्रमुख अतिथी रामकृष्ण चव्हाण न्यायाधीश वसई व नानासाहेब जेऊघाले उपसरपंच ग्रामपालिका विंचूर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
4) सोमवार 8 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता माजी विद्यार्थी देणगीदार हितचिंतक स्कूल कमिटी मिळावा व विद्यार्थी सत्कार तसेच सावित्री तु होतीस म्हणूनच .... या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा जाधव -निकम यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोरजी दराडे व प्रमुख अतिथी शिवचरण पांढरे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस स्टेशन असणार आहेत.
5) मंगळवार 9 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता रयत शिक्षण संस्था काल आज उद्या व कर्मवीरांच्या जीवनावरील माहितीपट दाखविला जाणार आहे. तसेच गुणवंत शिक्षक सत्कार आजच्या विद्यार्थ्यांपुढील आव्हाने व उपलब्ध संधी या विषयावर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पोलीस संजय दराडे साहेब यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. भगीरथजी शिंदे साहेब व्हा.चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा व श्रीमती सरोज जगताप गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती निफाड प्रमुख अतिथी असणार आहेत.
6) बुधवार 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता प्राध्यापक सुरेश नारायणे, नांदगाव महाविद्यालय यांचे बहुजनांचे कैवारी कर्मवीर भाऊराव पाटील या विषयावर व्याख्यान होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष जयदत्त होळकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव व भरत कळस कर साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक विभाग असणार आहेत.
7) गुरुवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता वॉल कंपाऊंड, मिनी सायन्स सेंटर उपक्रम उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून विजयराव म्हस्के यांचे विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यातील सुसंवाद या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुधीरजी तांबे साहेब व प्रमुख अतिथी नितीनजी बच्छाव साहेब शिक्षणाधिकारी जि प नाशिक उपस्थित राहणार आहेत. 
तसेच या संपूर्ण सप्ताहात वृक्षारोपण, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, क्रीडा महोत्सव व पालक मेळावा यासारखे सहशालेय उपक्रम देखील संपन्न होणार आहे.




No comments:

Post a Comment