दि.५/१०/२०१८ - शताब्दी फलकाचे अनावरण व मिनी मॅरेथॉन स्पर्धा
विंचूर विद्यालयात रयत शताब्दी महोत्सवानिमित्त मिनी मॅरेथॉन स्पर्धा व शताब्दी फलकाचे अनावरण
विंचूर
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव
साजरा होत असून त्यानिमित्ताने शुक्रवार दिनांक 5/10/ 2018 रोजी सकाळी
8:00 वाजता स्व. मातोश्री सुशीलाबाई हरिकिसन मालपाणी यांच्या स्मरणार्थ
मिनी मॅरेथॉन स्पर्धा एमआयडीसी विंचुर येथे झाली. याप्रसंगी रयत शिक्षण
संस्था उत्तर विभागाचे सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, डॉ.सुजित
गुंजाळ, डॉ. चौधरी, डॉ.जेऊघाले, विंचूर पत्रकार संघाचे अध्यक्ष
डी.बी.कादरी साहेब , श्री दरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या
इयत्ता १० ते १२ वी च्या विद्यार्थी -विद्यार्थिनीनी मोठ्या प्रमाणात
स्पर्धेत सहभाग घेतला. या कामी डॉ. आवारे लासलगाव यांनी सहकार्य केले. या
मॅरेथॉन स्पर्धेचे संपूर्ण नियोजन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक के.डी. पाटील
यांनी केले. विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी तसेच डॉक्टर असोसिएशन, विंचूर
ग्रामस्थ यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी याकामी सहकार्य केले. लासलगाव
पोलीस स्टेशन येथील मोहरे साहेब यांनी चोक बंदोबस्त ठेवला. या सर्वांचे
विद्यालयाचे प्राचार्य यांनी आभार मानले. तद्नंतर
सकाळी 11 वाजता शताब्दी फलकाचे अनावरण काकासाहेब गुंजाळ स्थानिक सल्लागार
शिक्षण समिती अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी
राजाभाऊ दरेकर, अविनाशजी दुसाने, किशोर पाटील, नारायण गुरुजी,पंढरीनाथ
दरेकर, सुनील मालपाणी, प्राचार्य जी.जी. पोफळे, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण,
पर्यवेक्षक एस.पी.पगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.के.
चांदे व आभार प्रदर्शन जे.पी.पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment