दि. ०६/१०/२०१८ - चित्ररथ मिरवणूक व वृक्षारोपण
विंचूर विद्यालयात शताब्दी महोत्सवानिमित्त चित्ररथ मिरवणूक
विंचूर
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रयत शिक्षण संस्था शताब्दी
महोत्सवानिमित्त भव्य चित्ररथ मिरवणूक संपन्न झाली. याप्रसंगी नियोजित
अध्यक्ष नारायणे गुरुजी, प्रमुख अतिथी आत्माराम दरेकर, संजय शेवाळे,
पंढरीनाथ दरेकर, पी.के. जेऊघाले सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
बी.आर. नागणे व आर.के.चांदे यांनी केले. मिरवणुकीमध्ये लेझीम, झांज, टिपरी
पथक, कमवा व शिका असे विविध दृश्ये समाविष्ट करण्यात आली. तसेच विद्यालयात
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मिरवणूक यशस्वीपणे पार
पाडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे, उपमुख्याध्यापक प्रविण
ढवण, पर्यवेक्षक एस.पी. पगार व व्ही.व्ही.मापारी तसेच प्राथमिक विद्यामंदिर
चे मुख्याध्यापक ए.सी.आव्हाड यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment