दिनांक ०७/१०/२०१८ - विज्ञान प्रदर्शन
विंचूर विद्यालयात शताब्दी महोत्सवानिमित्त विज्ञान प्रदर्शन संपन्न....
विंचूर
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न
झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिलभाऊ मालपाणी, प्रमुख अतिथी सरपंच
सौ.ताराबाई क्षिरसागर, आबा दरेकर पी.के.जेऊघाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक पर्यवेक्षक व्ही.व्ही.मापारी यांनी केले. त्यानंतर कुमारी
पल्लवी जाधव हिने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच वक्तृत्व व चित्रकला
स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी
विज्ञान उपकरणे, खेळणी प्रदर्शन, पोस्टर प्रेझेंटेशन, वैज्ञानिक रांगोळी,
क्रीडा स्पर्धा, बाल आनंद मेळावा इत्यादी उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक
केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी के.डी.पाटील, ए.जे. म्हस्के, शिंदे
व्ही.डब्ल्यू., कोळी पी.एल., पारधी के.बी. सर्व शिक्षक - शिक्षकेतर
कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
जे.पी. पाटील व बी.आर. नागणे यांनी तर पाहुण्यांचा सत्कार व आभार प्रदर्शन
आर.के. चांदे यांनी केले.

















No comments:
Post a Comment