Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday, 9 October 2018

दिनांक ०८/१०/२०१८ - व्याख्यानमाला पुष्प १ ले व माजी विद्यार्थी मेळावा

दि. ०८/१०/२०१८ - व्याख्यानमाला पुष्प १ ले 

विंचूर विद्यालयात  शताब्दी महोत्सवानिमित्त  व्याख्यान माला पुष्प पहिले  व  माजी विद्यार्थी  मेळावा संपन्न

                  विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सोमवार दिनांक 08/10/2018 रोजी रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष मा.शिक्षक आमदार किशोर दराडे साहेब, प्रमुख अतिथी लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. शिवचरण पांढरे साहेब उपस्थित होते. त्याचप्रमाणे व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी प्रसिद्ध व्याख्यात्या प्रा. डॉ. प्रतिभा जाधव निकम उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक आर.के.चांदे यांनी केले. याप्रसंगी इयत्ता दहावी व बारावी मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष मा.दराडे साहेब यांनी शाळेला वॉल कंपाऊंड बांधून देण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यालयाचे माजी शिक्षक श्री. शेटे एस.एन. यांनी विद्यालयाला रु. 5101,  आबासाहेब दरेकर यांनी 3001 रु.देणगी दिली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मा.पांढरे साहेब यांनी शताब्दी महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रा. डॉ.प्रतिभा जाधव -निकम यांनी सावित्री तू होतीस म्हणून... या विषयावर व्याख्यान दिले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री ज्योतिबा फुले यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी केलेला त्याग व कार्य या विषयावर आपल्या खास शैली मध्ये विद्यार्थ्यांची मने जिंकली. याप्रसंगी सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य श्री नारायणे गुरुजी,  सुनिलभाऊ मालपाणी,  ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ दरेकर, शेटे सर, माजी विद्यार्थी, आबासाहेब दरेकर, भगत सर, कडलक सर, शैलेश गायकवाड संजय शिरसाट उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे, उपमुख्याध्यापक प्रवीण ढवण, पर्यवेक्षक एस पी पगार, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ,  हितचिंतक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बी.आर.नागणे व आर.के.चांदे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक व्ही.व्ही.मापारी यांनी केले.































No comments:

Post a Comment