दिनांक ०९/१०/२०१८ - व्याख्यान माला पुष्प दुसरे
विंचूर विद्यालयात शताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यान माला पुष्प दुसरे संपन्न ...............
कर्मवीरांच्या आदर्शांना अनुसरूनच रयत शिक्षण संस्थेची उत्कर्षाकडे वाटचाल - अॅड. भगीरथजी शिंदे ...............
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मंगळवार
दिनांक 09/10/2018 रोजी रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सवानिमित्त
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प संपन्न झाले.कार्यक्रमाची सुरुवात
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक आर.के.चांदे यांनी केले. याप्रसंगी विविध
स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन अभिनंदन तर विद्यालयास
देणगी देणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य
अतिथी मा.रुपचंदजी भागवत (उपसभापती पं.स.येवला यांनी इमारत बांधकामासाठी
२१००० रु. देणगी व शताब्दी महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी
माजी सेवक पी.एस.गुजर - २५००० रु, पी.के.जेऊघाले - १११११ रु., ए.टी.बोरसे
३१००० रु, उपशिक्षिका श्रीम.शिंदे जे.एस. २१००० रु. ग्रामस्थ आत्माराम
दरेकर ५००० रु., रामकृष्ण मवाळ २१००० रु. यांनी विद्यालयास देणगी दिली.
त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आय.पी.एस. मनमाड विभाग - रागसुधाजी
मॅडम यांनी विद्यार्थ्याना आजच्या प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन
मा.भगिरथजी शिंदे साहेब यांनी संस्थेचा इतिहास, संस्थेत सध्या सुरू असलेले
विविध प्रकल्प, उत्कर्षाकडे होत असलेली वाटचाल व प्रगती, संस्थेच्या विविध
शाखांच्या विकासामध्ये ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी व पदाधिकारी यांचे
असलेले महत्त्व व योगदान याबद्दल आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, उपाध्यक्ष कैलासशेठ
सोनवणे, सदस्य श्री नारायणे गुरुजी, पं.स.सदस्य निफाड संजय शेवाळे, सरपंच
सौ.ताराबाई क्षिरसागर,आय.डी.बी.आय. बँक लासलगाव येथील मॅनेजर गडाख साहेब व
त्यांचे सहकारी, तसेच केशवराव क्षिरसागर, आत्माराम दरेकर, रणजीत गुंजाळ,
आबासाहेब दरेकर, विनायक जेऊघाले, शंकर दरेकर, माजी रयतसेवक
व्ही.एम.सालगुडे, सोनवणे सर, पत्रकार किशोरजी पाटील साहेब, डी.बी.काद्री
साहेब, जगन्नाथजी जोशी, नितीनजी गायकवाड, दीपकजी घायाळ ग्रामस्थ उपस्थित
होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे,
उपमुख्याध्यापक प्रवीण ढवण, पर्यवेक्षक एस पी पगार, व्ही.व्ही.मापारी, सर्व
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ, हितचिंतक यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बी.आर.नागणे व आर.के.चांदे यांनी केले तर आभार
प्रदर्शन के.डी.पाटील यांनी केले
No comments:
Post a Comment