दिनांक १०/१०/२०१८ - व्याख्यान माला पुष्प तिसरे
विंचूर विद्यालयात शताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यान माला पुष्प तिसरे संपन्न ...............
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मंगळवार दिनांक 10/10/2018 रोजी रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प
संपन्न झाले. सर्वप्रथम
मान्यवरांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शन उद्घाटन व त्यानंतर प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन
संपन्न झाले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक जे.पी.पाटील यांनी
करून दिला.
याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार व विविध स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे
पारितोषिक देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जयदत्त होळकर (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती
लासलगाव) यांनी शताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेला व विद्यालयास शुभेच्छा दिल्या व
व्याख्यानमालेचे कौतुक केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व विद्यालयाचे
माजी विद्यार्थी मा.प्रा.सुरेश नारायणे (नांदगाव महाविद्यालय) यांनी बहुजनांचे
कैवारी-कर्मवीर भाऊराव पाटील या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शालेय
जीवनातील आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी
सल्लागार समितीचे
अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, सदस्य श्री नारायणे
गुरुजी व परिवार, पंढरीनाथ दरेकर, संजय शेवाळे (पं.स.सदस्य निफाड), मा.गोकुळ पाटील (मा.पं.स.सदस्य), अनंत सावंत, प्रा.उकिर्डे
सर (नांदगाव) आबासाहेब दरेकर, ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यालयाचे
प्राचार्य जी.जी.पोफळे, उपमुख्याध्यापक
प्रविण ढवण, पर्यवेक्षक एस पी पगार, मापारी व्ही.व्ही., सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ, हितचिंतक यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.के.चांदे व
बी.आर.नागणे यांनी केले तर आभार प्रदर्शन ए.एच.पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment