Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 12 October 2018

दिनांक ११/१०/२०१८ :- व्याख्यानमाला पुष्प चौथे

दिनांक ११/१०/२०१८ :- व्याख्यानमाला पुष्प चौथे

कर्मवीरांच्या कार्यामुळेच आजचा सुशिक्षित समाज घडू शकला– आमदार सुधीरजी तांबे

                 विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मंगळवार दिनांक 11/10/2018 रोजी रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यानमालेचे चौथे पुष्प  गुंफण्यात आले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वॉल कंपाउंड आणि मिनी सायन्स सेंटर उद्घाटन समारंभ संपन्न झाला व त्यानंतर प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार व विविध स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे उपशिक्षक पंकज सरोदे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मा.सरोज जगताप (गटशिक्षणाधिकारी, निफाड) यांनी विद्यार्थ्यांना सदाचार व चांगले आचारविचार अंगी बाणण्याचे आवाहन केले. मुलींच्या सुरक्षिततेसंबंधी विशाखा समितीचे कार्य व शिक्षकांची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.बी.काद्री साहेब व स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष मा.कैलास सोनवणे यांनी शताब्दी महोत्सवानिमित्त विद्यालयात सुरु असलेल्या उपक्रमांचे कौतुक आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.विजयराव म्हस्के - अध्यक्ष दिव्यांग संघटना महा.राज्य यांनी विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यातील सुसंवाद या विषयावर विविध उदाहरणे व दाखल्याद्वारे आपले विचार मांडले. जीवनात यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत व जिद्द अंगी असू द्या असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषद सदस्य, महा.राज्य मा.आमदार सुधीरजी तांबे साहेब यांनी शताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेला व विद्यालयास शुभेच्छा दिल्या व व्याख्यानमालेचे कौतुक केले. यानिमित्ताने विद्यालयाचे माजी विद्यार्थी व धुळे येथे कार्यरत असलेले पोलीस इन्स्पेक्टर सतिश म्हसू गोराडे यांनी विद्यालयास १०००० रु.देणगी दिली. याप्रसंगी रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य नारायणे गुरुजी, सुनिल मालपाणी, स्थानिक सल्लागार समिती सदस्य पंढरीनाथ दरेकर, गोपिनाथ ढवण, अनिल दरेकर, सेवानिवृत्त शिक्षक शेटे सर, पत्रकार नितीनजी गायकवाड, संदीपजी शिरसाठ, ग्रामस्थ राजाराम दरेकर, के.के.जेऊघाले, आबासाहेब दरेकर, सतीश शेलार, अमोल गुंजाळ, राहुल निकाळे, मुकेश बोराडे, पालक, संस्था व शाखा हितचिंतक, माजी विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण, पर्यवेक्षक एस पी पगार, व्ही.व्ही.मापारी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.के.चांदे व उपशिक्षिका बी.आर.नागणे यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.डी.शिंदे यांनी केले.












No comments:

Post a Comment