जागतिक हात धुवा दिन व वाचन प्रेरणा दिन
विंचूर विद्यालयात जागतिक हात धुवा दिन व वाचन प्रेरणा दिन साजरा
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात जागतिक हात धुवा दिन व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सकाळ व दुपार सत्रात विद्यार्थ्यांसमोर उपशिक्षिका सौ.ए.एम.पवार व सौ.एस.ए.खरात यांनी स्वच्छ हात धुण्याचे प्रात्यक्षिक व महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर वाचन प्रेरणा दिन प्रसंगी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तके व वाचनाचे महत्त्व उपशिक्षक जे.पी.पाटील यांनी आपल्या मनोगतातून समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तकांची गोडी लागली म्हणून ग्रंथपाल पी.सी.शेलार यांनी विविध पुस्तके वाचण्यास दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.पी.पगार होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आर.के. चांदे व सौ.के.एम. निकम यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक व्ही.व्ही. मापारी, के.डी. पाटील, एम.एम. पवार, उपशिक्षिका ए.सी.पाटील, आर.पी.सरोदे, जे.बी. सोनवणे, बी.आर. नागणे, सदाफळ , दळवी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment