डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन :- दि.०६.१२.२०१८
विंचुर विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा.......
विंचुर
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा
महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे
प्राचार्य जी.जी. पोफळे होते. याप्रसंगी बाबासाहेबांच्या जीवनावर
विद्यालयातील विद्यार्थी कुणाल नेवगे, सत्यम सोनवणे, कविता माळशिकारे,
गायत्री निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
उपशिक्षक आर.के.चांदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन जोएफ शहा या
विद्यार्थ्याने केले. सकाळ सत्रात उच्च माध्यमिक शिक्षक एस.डी.शिंदे यांनी
सूत्रसंचालन केले तर उपशिक्षक जे.पी.पाटील यांनी याप्रसंगी आपले मनोगत
व्यक्त केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक प्रविण ढवण, पर्यवेक्षक
व्ही.व्ही. मापारी, वर्पे सर, आहेर पी.बी., सर्व शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment