विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम
विंचूर विद्यालयात विविध गुणदर्शन (सांस्कृतिक) कार्यक्रम संपन्न............
विंचूर, दि.२५ डिसें.२०१८- येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माजी खासदार समीर भाऊ भुजबळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीेचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ होते. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य जी.जी. पोफळे यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षा डॉ.भारती पवार यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात घवघवीत यश मिळविलेल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कौतूक केले. हे येथील शिक्षक व पालकांचे यश आहे. यापुढेही स्पर्धेच्या काळात विद्यार्थी घवघवीत यश मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. उद्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी शिक्षक अथक परिश्रम घेतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करून अद्वितीय असे काम बहुजनांसाठी केले असल्याचे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. तसेच मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांनी राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल विद्यालयातर्फे त्यांना सन्मानपत्र बहाल करण्यात आले. त्यांच्या वतीने हे सन्मानपत्र मा. समीर भुजबळ यांनी स्वीकारले. या सन्मानपत्राचे वाचन उपशिक्षिका सौ.आर.पी.सरोदे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते, कोळीगीत, शेतकरी गीत, गायन, नाटिका, नृत्य अविष्कार सादर केले. परीक्षक म्हणून वनसगाव विद्यालयाचे उपशिक्षक जी.एस.गोसावी व विद्यालयाची माजी विद्यार्थीनी उषा बिबे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य निफाड संजय शेवाळे , विंचूर ग्रामपंचायत सरपंच ताराबाई क्षिरसागर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, वसंतराव पवार, कैलास सोनवणे, आत्माराम दरेकर, राजाराम दरेकर, पांडुरंग राऊत, रामकृष्ण मवाळ, नारायणे गुरुजी, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, रणजीत गुंजाळ, पी.के.जेऊघाले सर, दिनकर चव्हाण, विनायक जेऊघाले, आबा दरेकर, उपसरपंच धनंजय पवार, शंकर दरेकर, लोंढे साहेब, लोखंडे साहेब, पैठणकर साहेब, ग्रामस्थ, हितचिंतक, माता-भगिनी, पत्रकार, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर के चांदे, सौ.के.एम. निकम, श्रीम.बी.आर. नागणे यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे पर्यवेक्षक व्ही.व्ही.मापारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक प्रविण ढवण, ज्येष्ठ शिक्षक वर्पे सर, आहेर पी.बी., ग्रंथपाल शेलार मॅडम, के.डी.पाटील, ए.एच.पाटील, एम.एस.निकम, एम.एम.पवार, पी.ए.सरोदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Well done
ReplyDelete