विंचूर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.................
विंचूर , २६ डिसेंबर :- विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते विवेक उगलमुगले यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विंचूर ग्रामपालिकेच्या सरपंच सौ.ताराबाई क्षिरसागर होत्या. प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचयविद्यालयाचे पर्यवेक्षक मापारी व्ही.व्ही. यांनी करून दिला. नंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्तेविद्यालयातील वर्षभरातील विविध स्पर्धा, परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग , तालुका ,जिल्हा,विभाग,राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा व रयत गुरुकुल प्रकल्पातीलयशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व मेडल अशा स्वरूपातपारितोषिके देऊन गौरवण्यात आले.तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमातील वैयक्तिक व सामुहिक प्रकारातीलविजेते संघ व वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. विद्यालयाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार इयत्ता 10 वी अमधील विद्यार्थिनी कु.पल्लवी धनाजी जाधव या विद्यार्थिनीस पाहुण्यांच्याहस्ते देण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व व्याख्याते विवेक उगलमुगले यांनी वाचन व संस्कारांचे महत्व आपल्या प्रेरणादायी मनोगतातून व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी यशस्वी विद्यार्थ्यांना देण्यात पारितोषिके उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य श्री.सुनिलभाऊ मालपाणी यांच्या वतीने दरवर्षी दिली जातात. तसेच कार्यक्रमासाठी उपलब्ध भव्य अशा मंडपासाठी जेष्ठप्राध्यापक यु.बी.वर्पे सर यांनी १०००० रु. तर ग्रंथपाल श्रीम.शेलार पी.सी. यांनी ५००० रु. देणगी देऊन विद्यालयास सहकार्य केले. या कार्यक्रमास स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, सदस्य नारायणे गुरुजी, पंढरीनाथ दरेकर व तसेच ग्रामस्थ केशवराव क्षिरसागर, आबादरेकर, राजाराम दरेकर, धोंडीराम चव्हाण, धनाजी जाधव, पत्रकार काद्री साहेब, नितीन गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.के. चांदे वबी.आर.नागणे यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाचेउपशिक्षक ए.एच.पाटील यांनी आभार मानले.















































































Miss my school days
ReplyDelete