Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday, 30 January 2019

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

विंचूर विद्यालयात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये ७० वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष मा.श्री.काकासाहेब गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच स्काऊट गाईड व एमसीसी संचलन द्वारे ध्वजास मानवंदना देण्यात आली. यानंतर गावातून विविध घोषणा व ढोलताशांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थी आवेश शहा, साहिल शहा, अभिजित भोसले, अनिकेत मवाळ, राहुल नागरे, महेश दरेकर, साहिल मोमीन, तेजस दरेकर, संकेत ठुबे यांच्याकडून विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व कंपास वाटप करण्यात आले. त्यांना प्रा.जे.पी.दरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. या कार्यक्रमास स्थानिक सल्लागार समिती सदस्य नारायणे गुरुजी, सुनिलभाऊ मालपाणी, जगदीश जेऊघाले,  पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर व ग्रामस्थ दिनकर चव्हाण, विनायक जेऊघाले, पी.के.जेऊघाले, एस.एस.कुशारे उपस्थित होते.





























































































No comments:

Post a Comment