विंचुर विद्यालयाचे चित्रकला परीक्षेत यश....
विंचूर ता. निफाड येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा शासकीय चित्रकला एलिमेंट्री परीक्षेचा 98 टक्के व इंटर मिजिएट परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला. विद्यालयात एलिमेंटरी परीक्षेत मोनिका दरेकर, साक्षी गिरमे, तृप्ती जाधव,खुशाली परदेशी, रूपाली पाडेकर, समीक्षा रोटे या सहा विद्यार्थिनी अ श्रेणीत तर ब श्रेणीत 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंटरमिजीएट परीक्षेत सविता चव्हाण, कोमल चव्हाण या 2 विद्यार्थिनी अ श्रेणीत तर 5 विद्यार्थी ब श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शक कला शिक्षक- व्ही.जे.कांबळे व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment