तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विंचूर विद्यालयाचे सुयश.....
रानवड ता.निफाड येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील
शुभम खैरे व तेजस चौधरी यांनी उच्च माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक
पटकावला. त्यांना विद्यालयाचे उपशिक्षक एस.एन. शेवाळे यांचे मार्गदर्शन
लाभले. त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य,
विद्यालयाचे प्राचार्य जी .जी. पोफळे, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण,
पर्यवेक्षक व्ही.व्ही.मापारी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व
हितचिंतक यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment