Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 6 January 2019

रयत विज्ञान परिषद-सुयश

रयत विज्ञान परिषदेत गेम बेस्ड लर्निंग साठी पंकज सरोदे यांना १ ले पारितोषिक ....

       वाशी नवी मुंबई येथे पार पडलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या रयत विज्ञान परिषदेत विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे उपशिक्षक पंकज सरोदे यांनी संस्थेच्या पाचही विभागात गेम बेस्ड लर्निंग या विभागात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच एम.एस.निकम व श्रेयस पगारे यांनी अॅक्टिविटी बेस्ड लर्निंग, व्ही.सी.भोसले यांनी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, कु.साक्षी कदम हिने निबंध लेखन, एम.एन.क्षिरसागर व योगेश काळे यांनी इंक्वायरी बेस्ड लर्निंग यासारख्या विविध विभागात सहभाग नोंदवला. त्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, तसेच प्राचार्य जी.जी.पोफळे, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण, पर्यवेक्षक व्ही.व्ही.मापारी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
 
 















No comments:

Post a Comment