Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 6 January 2019

वाहतूक सुरक्षा सप्ताह - मार्गदर्शन

विंचूर विद्यालयात वाहतूक सुरक्षा सप्ताह मार्गदर्शन कार्यक्रम साजरा.... 

                 विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मा.प्राचार्य जी.जी.पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरक्षा सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मा.विनयजी अहिरे साहेब होते. यावेळी वाहतूक निरीक्षक धात्रक साहेब आणि लासलगाव येथील भोलेनाथ मोटर ड्रायविंग स्कूलचे संचालक अनंत सावंत साहेब उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचा परिचय प्रा. टी.ए.पवार यांनी करून दिला. याप्रसंगी धात्रक साहेबांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर  विनयजी अहिरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा या विषयावर सविस्तरपणे प्रोजेक्टरवर चित्रफिती दाखवून तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्यास आव्हान करून वाहतुक नियमा संदर्भात असलेले अज्ञान दूर केले तसेच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.के.चांदे यांनी तर आभार प्रदर्शन जे.पी.पाटील यांनी केले. याप्रसंगी पर्यवेक्षक व्ही.व्ही.मापारी, प्रा.यु.बी.वर्पे, एम.एम.पवार, एस.डी.शिंदे, पी.एस.गाडे, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन परिवहन समिती प्रमुख सौ.ए.एम.पवार व टी.ए.पवार यांनी केले.


















No comments:

Post a Comment