Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday, 30 January 2019

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

विंचूर विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी......
१२ जाने, विंचूर- येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती (राष्ट्रीय युवा दिन) उत्साहात साजरी करण्यात आली. रयत शिक्षण संस्था अंतर्गत शाळा सिद्धि इन्स्पेक्शन साठी उपस्थित असलेले ठाणगाव विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एस.कवडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले. त्यानंतर कु.पल्लवी जाधव, कु.चंदन जाधव, शुभम सोनवणे व ऋषीराज देवरे यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कु.साळुंके हिने आपल्या वेशभूषेद्वारे जिजाऊंचे जिवंत चित्र उभे केले. कार्यक्रमासाठी व शाळा सिद्धि मूल्यांकनासाठी श्री.नामदेव शिवाजी शिंदे (चेअरमन सदस्य -ठाणगाव), श्री.आव्हाड व्ही.एफ. (माजी मुख्याध्यापक-ठाणगाव), श्री.माळी जे.एस.( मुख्याध्यापक - सोमठाणे), श्री.भामरे आर. एम.(मुख्याध्यापक- मानोरी), श्री.ह्याळीज आर.के.(सोमठाणे), श्री.गांजवे बी.एस.(मानोरी), श्री.भांगरे बी.एस.(ठाणगाव), श्री.रेवगडे एस.पी.(ठाणगाव), श्री. वाकचौरे व्ही.एस.(ठाणगाव), श्री.पारीख ए.आर.(ठाणगाव) उपस्थित होते. पथकातील सर्व सदस्यांनी शाळेची अंंतर्बाह्य तपासणी करून मूल्यांकन केले. विद्यालयाच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य जी.जी. पोफळे यांनी विद्यालयातील सर्व क्षेत्रप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले




































































No comments:

Post a Comment