मतदार जनजागृतीसाठी रॅली
विंचूर विद्यालयात मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांमार्फत रॅलीचे आयोजन ............
विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांमार्फत रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रथम विद्यालयातील जेष्ठ शिक्षक पी.बी.आहेर व के.जी.जोपळे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्व, सर्व पात्र मतदारांनी मतदान करणे, तसेच मतदानाचे प्रमाण वाढवण्याची आवश्यकता पटवून सांगितली व त्याप्रमाणे समाजातील लोकांना उद्बोधन करण्याचे आवाहन केले. यानंतर गावातून विविध घोषणा फलकांसह मतदार जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण, पर्यवेक्षक व्ही.व्ही.मापारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.के.चांदे यांनी केले.
No comments:
Post a Comment