Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 28 March 2019

अटल टिंकरिंग लॅब

विंचूर विद्यालयास अटल टिंकरिंग लॅब मंजूर............

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास केंद्र शासन पुरस्कृत निती आयोगामार्फत अटल टिंकरिंग लॅब मंजूर झाली आहे. त्यानुसार निती आयोगामार्फत अटल टिंकरिंग लॅबची उभारणी करून दिली जाणार आहे. सदर लॅबच्या उभारणीसाठी २० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे. या लॅबचा लाभ विद्यालयाच्या २५०० विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे यांनी दिली. याबद्दल स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ व सर्व सदस्यांनी तसेच ग्रामस्थ, पालक, पत्रकार, हितचिंतक यांनी विद्यालयाचे प्राचार्य जी.जी पोफळे, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण, पर्यवेक्षक एस.पी.पगार, व्ही.व्ही.मापारी, अटल लॅब समन्वयक वसावे एस.आर., शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment