विंचूर विद्यालयात लाईफ वर्कर श्री.राजेंद्र चांदे सर यांचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न...
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर पदी निवड झाल्याबद्दल श्री.राजेंद्र चांदे सर यांचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री.लक्ष्मणराव गुंजाळ होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.जयदत्त होळकर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्तविक पर्यवेक्षक व्ही.व्ही.मापारी यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी सत्कारमूर्ती लाईफ वर्कर श्री.राजेंद्र चांदे सर यांचा सन्मानचिन्ह, शाल व बुके देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच डॉ.सुजित गुंजाळ, डॉ.विलास कांगणे, नारायणे गुरुजी, प्राचार्य जी.जी.पोफळे, जयदत्तजी होळकर, लक्ष्मणराव गुंजाळ इ. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून चांदे सरांचे अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमास पं.स.सदस्य संजय शेवाळे, सरपंच ताराबाई क्षिरसागर, पंढरीनाथ दरेकर, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, अविनाश दुसाने, रणजित गुंजाळ, शंकर दरेकर, रामकृष्ण मवाळ, राजाराम दरेकर, दिनकर चव्हाण, केशव क्षिरसागर, डॉ.रमेश सालगुडे, पत्रकार किशोर पाटील, डी.बी.काद्री, नितीन गायकवाड, बापू सोदक, दिलीप चव्हाण, महाजन सर, सौ.अंजना वाघ, विजय लोहारकर, प्रशांत गोरे, संजय शिरसाठ, बाबासाहेब आरगडे, संतोष पवार, संजय चांदे, भाऊ कल्याणकर, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण, पर्यवेक्षक एस.पी.पगार, शिक्षक –शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment