Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 28 March 2019

लाइफ वर्कर पदी निवड

श्री.राजेंद्र चांदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाइफ वर्कर पदी निवड...

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षक श्री राजेंद्र खंडेराव चांदे सर यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाइफ वर्कर पदी निवड झाली. संस्थेच्या आतापर्यंतच्या सेवेत त्यांचे विद्यालयातील विविध उपक्रमात, कामकाजात, विद्यार्थी शिस्त व गुणवत्ता इ.बाबत सक्रीय असे योगदान आहे. शाळा,विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या अडीअडचणी सोडवण्यात नेहमी पुढाकार घेतात. विद्यार्थ्यांमध्ये देखील ते अतिशय प्रिय असलेले शिक्षक आहेत. त्यांच्या या सार्थ निवडीबद्दल संस्थेचे व्हाईस चेअरमन मा.भगिरथजी शिंदे साहेब, स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष मा.काकासाहेब गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी व नारायणे गुरुजी, सर्व स्थानिक सल्लागार समिती सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य जी.जी. पोफळे, उपमुख्याध्यापक प्रविण ढवण, पर्यवेक्षक एस.पी.पगार, व्ही.व्ही.मापारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment